सत्य अहिंसेचे चिरंतन तत्व
जे जगले ते गांधी झाले..
कर्मसिद्धांत विचारांनी ज्यांनी सिद्ध
केला ते गांधी झाले..
स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन
कृतीतून दाखवले ते गांधी झाले..
चरख्यातून ज्यांनी देश एकत्र
केला ते गांधी झाले..
अर्धनग्न राहून ज्यांनी सुटकोटातल्या
सत्तेला हालवले ते गांधी झाले..
प्रेमाच्या काठीने जगही जिंकता येते
हे ज्यांनी दाखवले ते गांधी झाले..
जे आपल्या शत्रूवरही प्रेम
करायला शिकवले ते गांधी झाले..
मृत्यूनंतरही करोडोंच्या
हृदयात अमर झाले ते महात्मा झाले..
©Bhushan Thakare
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here