World Book Day
📚 पुस्तकांशी मैत्री📚
मैत्री करावी पुस्तकाशी,
जे ना देती अंतर कधीही.
कोणत्याही संकटातुनी,
निसटण्याचा मार्ग देती,
कधीही,केव्हाही...
प्रेम करावे पुस्तकांवर,
जे मागत नाही काही.
मन खिन्न असो वा उदासी,
रूसत नाही कधीही,
भरभरून देती सर्वकाही...
चांगल्या गोष्टींची प्रचिती देतात,
वाईट गोष्टींची माहिती सांगतात.
सुवळण देण्या जीवनाला,
संस्कार मोतीही पाजितात...
खळखळून हसवतात,
ह्रदयभरून आणतात.
एकांतातही सोबत करतात,
मनाचे द्वारही खोलतात...
इतिहास सांगतात,
संस्कृती टिकवतात.
मूल्येही जोपासतात,
मनरंजन,मनभंजनही करतात...
✍️सोमनाथ चव्हाण.
©somnath Chavan
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here