कणाकणात तू, जनमनात तू
सजीवही तू निर्जीवही तू
गगनात तू, श्वासात ही तू
ध्यानातही तू ,ज्ञानातही तू ll धृ ll
स्वप्नात ही तू, जगण्यात तू
विश्वात ही तू , ताऱ्या त ही तू
सृष्टीत ही तू, दृष्ठीत ही तू
विचारात तू आचारात तू ll,१ll
सामर्थ्य ही तू समर्थ ही तू
शक्ती ही तू भक्तीही तू
सखा ही तू सखी ही तू,
भावना ही तू कामना ही तू ll २ll
©Rajendrakumar Jagannath Bhosale
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here