अभंग 122
रूप पाहण्यास आलो, नाम छंदे गुंतलो
लवण जला विरलो, तुझे पायी ll धृ ll
देह त्यागी पंच भुते, काम क्रोध त्यागी तेथे,
जप अनुष्ठान जेथे,तुझे ठायी ll 1ll
जपता अष्टांग भाव, निर्गुणाचे नित्य नाव
सदेह वैकुंठ गाव, राजे म्हणे ll 2ll
कवी गायकसंगीत
श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले(राजे)
©Rajendrakumar Jagannath Bhosale
#SunSet