संविधान गीत
संविधान की जय हो संविधान की जय हो
संविधान देस की शान हैं
संविधान हमारा प्राण हैं
जय हिंद जय हिंद जय हिंद ll धृ ll
सार्वभौम समाजवादी लोकशाही
धर्मनिरपेक्ष गणराज्या ची ग्वाही
सामाजिक आर्थिक अन राजनैतिक न्याय
संविधानात शोभे माझी भारत माय ll १ll
सुज्ञ विचार विश्वास अभिव्यक्ती
श्रद्धा अन उपासनेची स्वातंत्र्य शक्ती
दर्जाची व संधीची इथ समानता
भारताच्या संविधानावर ठेवा माथा ll २ll
व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता
एकात्मतेची वसे इथ बंधुता
जगमान्य आहे भारताचे संविधान
भीम लेखणीला दिला हा बहुमान ll ३ll
कवी गायक संगीत
श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
©Rajendrakumar Jagannath Bhosale
#sad_qoute