English
New Year 2024-25 वर्ष सरलं म्हणून दुःख नसतेचं पण सरत्या वर्षाच्या जोडीला घटका घटकात वय गिळणारा ब्रम्हराक्षस दबा धरून असतो जो जन्म आणि मृत्यूमधील अंतर कापून अनंताच्या प्रवासाला जाण्यास मनुष्यास उदयुक्त करत असतो खरी मेख तिथेच असते...!! #सरते वर्ष...!! ©शुभ पडघान
शुभ पडघान
16 Love
देश माझा जगाचा अन्नदाता ही बाब ठरली आज खरी आहे...!! अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!! #शेतकरी दिन...!! ©शुभ पडघान
12 Love
शिवरायांच्या शौर्याची गाज...!! संतांच्या साहित्याचा साज...!! सुधारकांच्या कार्याचा रिवाज...!! शास्त्रीय संगीताचा आवाज...!! असणारी माय मराठीच्या मुकुटावर अभिजाततेचा मुकुट बसविल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे मनस्वी आभार...!! 🙏🏻🎊🎉💐🚩🙏🏻 ©शुभ पडघान
भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!! पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!! #पाऊस...!! #संजीवनी...!! ©शुभ पडघान
White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!! #मतदान दिन...!! #लोकसभा निवडणूक...!! ©शुभ पडघान
15 Love
White काल परवा पासून सुरु असलेल्या नेते मंडळींच्या फोन मुळे एक बाब मात्र अधोरेखित होते ती म्हणजे लोकशाहीच्या बाजारातील मतदार हा असा माल आहे की ज्याची किंमत केवळ फक्त निवडणुकांवेळीचं वाढते...!! अन्य वेळी ज्याची जागा केवळ मोडकळीस आलेले घर अथवा पडीक जागाचं असते...!! #लोकशाहीचा उत्सव...!! #लोकसभा निवडणूक...!! ©शुभ पडघान
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here