White कवितेच्या वाटेला
चार ओळी लिहिल्या गेल्या
अथांग मनाच्या कोपऱ्यातून
दाटता कल्लोळ आठवणींचा
शब्द हे नवे उमटले अंतरातून
मी शोधीत कवितेच्या वाटेला
हरवलो माझ्या हळव्या मनात
शब्दसखा माझाच मीच झालो
गुंफता भाव माझ्याच गाण्यात
अमर आहे ही प्रत्येक ओळ
जरी आज तिचा कुणा ठाव नसे
भरकटलेल्या जीवनरुपी नावेला
सूचलेल्या कवितेतून दिशा दिसे
इतकी नागमोडी कवितेची वाट
कधी व्यथा, कधी आनंद अफाट
शब्द जोडता,मने जोडली जाती
सूर्योदयापुर्वीची सोनेरी पहाट
कविता आहे कला अंतरीची
मुक्त वाट दडल्या भावनांची
एकरुप होऊन स्वतःशी स्वतः
व्यक्त होण्याची रीत जीवनाची
जीवनाचे गाणे गात जगावे
कवितेतुनी आपण व्यक्त व्हावे
शब्दांतून मन स्वच्छ दिसावे
प्रत्येकाला असे कवी मन असावे.
प्रयाग पवार
©prayag pawar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here