कृष्ण मनातला...
काय उपमा देऊ कृष्णा
तुझ्या माझ्या नात्याला
न झालो सखा अर्जुन
न झालो सवंगडी सुदामा ||१||
न रमलो राधे सारखा, तरीही
जपले तुला मनाच्या कोपऱ्यात
पाहतो कधी त्या मोरपिसात
ऐकतो तुला बासरीच्या सुरात||२||
वसलास मनात माझ्या तुच
एक अलौकिक शक्ती बनून
हरवलेल्या दिशेचा वाटाड्या
कधी काटेरी वाटेवरचा सांगाती||३||
त्या अगाध तुझ्या बाललीला
दिसती आजही बालमनांत
नाजुक- नाजुक पावलांनी
तूच खेळ खेळसी घराघरांत||४||
भेट तुझी व्हावी एकदातरी
भेटावा मला कृष्ण मनातला
हळव्या चंचल मनास माझ्या
अर्थ समजावा जीवनातला.||५||
-प्रयाग पवार
वाघवाडी परळी सातारा
©prayag pawar
#Krishna