White कवितेच्या वाटेला चार ओळी लिहिल्या गेल्या अथ | मराठी मत आणि विचार

"White कवितेच्या वाटेला चार ओळी लिहिल्या गेल्या अथांग मनाच्या कोपऱ्यातून दाटता कल्लोळ आठवणींचा शब्द हे नवे उमटले अंतरातून मी शोधीत कवितेच्या वाटेला हरवलो माझ्या हळव्या मनात शब्दसखा माझाच मीच झालो गुंफता भाव माझ्याच गाण्यात अमर आहे ही प्रत्येक ओळ जरी आज तिचा कुणा ठाव नसे भरकटलेल्या जीवनरुपी नावेला सूचलेल्या कवितेतून दिशा दिसे इतकी नागमोडी कवितेची वाट कधी व्यथा, कधी आनंद अफाट शब्द जोडता,मने जोडली जाती सूर्योदयापुर्वीची सोनेरी पहाट कविता आहे कला अंतरीची मुक्त वाट दडल्या भावनांची एकरुप होऊन स्वतःशी स्वतः व्यक्त होण्याची रीत जीवनाची जीवनाचे गाणे गात जगावे कवितेतुनी आपण व्यक्त व्हावे शब्दांतून मन स्वच्छ दिसावे प्रत्येकाला असे कवी मन असावे. प्रयाग पवार ©prayag pawar"

 White कवितेच्या वाटेला

चार ओळी लिहिल्या गेल्या
अथांग मनाच्या कोपऱ्यातून
दाटता कल्लोळ आठवणींचा 
शब्द हे नवे उमटले अंतरातून

मी शोधीत कवितेच्या वाटेला 
हरवलो माझ्या हळव्या मनात 
शब्दसखा माझाच मीच झालो
गुंफता भाव माझ्याच गाण्यात 

अमर आहे ही प्रत्येक ओळ
जरी आज तिचा कुणा ठाव नसे
भरकटलेल्या जीवनरुपी नावेला
सूचलेल्या कवितेतून दिशा दिसे

इतकी नागमोडी कवितेची वाट
कधी व्यथा, कधी आनंद अफाट 
शब्द जोडता,मने जोडली जाती
सूर्योदयापुर्वीची सोनेरी पहाट 

कविता आहे कला अंतरीची
 मुक्त वाट दडल्या भावनांची
एकरुप होऊन स्वतःशी स्वतः 
व्यक्त होण्याची रीत जीवनाची

जीवनाचे गाणे गात जगावे
कवितेतुनी आपण व्यक्त व्हावे
शब्दांतून मन स्वच्छ दिसावे
प्रत्येकाला असे कवी मन असावे.

प्रयाग पवार

©prayag pawar

White कवितेच्या वाटेला चार ओळी लिहिल्या गेल्या अथांग मनाच्या कोपऱ्यातून दाटता कल्लोळ आठवणींचा शब्द हे नवे उमटले अंतरातून मी शोधीत कवितेच्या वाटेला हरवलो माझ्या हळव्या मनात शब्दसखा माझाच मीच झालो गुंफता भाव माझ्याच गाण्यात अमर आहे ही प्रत्येक ओळ जरी आज तिचा कुणा ठाव नसे भरकटलेल्या जीवनरुपी नावेला सूचलेल्या कवितेतून दिशा दिसे इतकी नागमोडी कवितेची वाट कधी व्यथा, कधी आनंद अफाट शब्द जोडता,मने जोडली जाती सूर्योदयापुर्वीची सोनेरी पहाट कविता आहे कला अंतरीची मुक्त वाट दडल्या भावनांची एकरुप होऊन स्वतःशी स्वतः व्यक्त होण्याची रीत जीवनाची जीवनाचे गाणे गात जगावे कवितेतुनी आपण व्यक्त व्हावे शब्दांतून मन स्वच्छ दिसावे प्रत्येकाला असे कवी मन असावे. प्रयाग पवार ©prayag pawar

#कविता

People who shared love close

More like this

Trending Topic