somadatta kulkarni

somadatta kulkarni

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #Krishna  White शीर्षक: वेड सावळ्या कृष्णाचे 

काय सांगू सखये बाई 
असे कसे आक्रीत झाले 
वेड सावळ्या कृष्णाचे 
मला खरोखर लागले      १

मन माझे वेधले त्याने 
माझी मी नच राहिले 
भुलले बाई सावळ्याला 
जेव्हा कान्हास पाहिले.   २

ऐकता मधूर मुरलीचे स्वर 
देहभान माझे हरपले 
काय सांगू काय जादू झाली 
कान्होबाच्या रंगात रंगले.   ३

सावळ्याचे रुप मनोहर 
डोळे भरून म्या पाहिले 
स्वर्ग लोकीचे सुख सखी 
आज खरेच मज लाभले. ४

मुर्ती मंत विष्णू स्वरूप 
जेंव्हा सावळ्यास पाहिले 
नाही आता परत येणे जाणे 
आयुष्य माझे धन्य जाहले  ५

©somadatta kulkarni

#Krishna

144 View

#Sad_shayri  White विठाई 


विटेवरी उभे |परब्रम्ह आहे

विठाई ती आहे|माय माझी.    १


कर कटेवरी |उभा विटेवरी

सावळा श्रीहरी|शोभतसे.        २


समचरण जे|डोळा साठवितो

मना ठसवितो|विष्णुरूप.        ३


पुंडलिका साठी|उभा भिमेकाठी

तो हा जगजेठी |कृपा करी.      ४


भक्तांचा कैवारी|अनाथांचा नाथ

संकटात साथ. |नित्य देई.        ५


पंढरीचा राणा| आहे माझा देव

नाही दुजा भाव|दास म्हणे.         ६


©®सोमदत्त कुलकर्णी

     हडपसर पुणे

©somadatta kulkarni

#Sad_shayri Hinduism

171 View

#Motivational  White बाप एक कल्पवृक्ष

बाप खरेच असतो
एक कल्पवृक्ष
जो नेहमीच असतो
कुटुंबासाठी दक्ष

बाप झटतो दीन रात
नाही बाळगत तमा
प्रेम सदैव काळजात
करी सर्वां क्षमा

बापाची महती थोर
झटतो दिनरात 
सर्वांच्या खुशालीचा           
त्याला असतो घोर

एवढे सारे करूनही
बाप दुर्लक्षित
दुनियेच्या नजरेत
बाप उपेक्षित

©somadatta kulkarni

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

144 View

 राम लहरी

धुंद झाले अवघे त्रैलोक्य
राम लहरी उमटल्या येथ
राम नामात दंग झाले सर्व
नाही दुःखाचा लवलेश तेथ  १

भवसागर खास पार होईल
अविनाश ब्रम्ह समजेल
घेता रामनाम निशिदिनी
संसाराचे मर्म उमजेल.  २

©somadatta kulkarni

राम लहरी धुंद झाले अवघे त्रैलोक्य राम लहरी उमटल्या येथ राम नामात दंग झाले सर्व नाही दुःखाचा लवलेश तेथ १ भवसागर खास पार होईल अविनाश ब्रम्ह समजेल घेता रामनाम निशिदिनी संसाराचे मर्म उमजेल. २ ©somadatta kulkarni

162 View

#snowpark  स्वातंत्र्यवीर  सावरकर


अवध्य असे मी | पुत्र भारताचा

वीर आहे साचा | या भूमीचा       १


सोडून संपदा |करी देश सेवा

इंद्र करी हेवा |सुपुत्राचा              २


अभिनव भारत |संघटना थोर

 कार्य आहे फार |सुपुत्रांचे            ३


ब्रिटिशांनी दिली |जन्मठेप शिक्षा

नच मागे भिक्षा | त्यांच्या पुढे           ४


भोगी कष्ट बहु | नाही ती विश्रांती

कष्टविली कांती |देशासाठी              ५


सेल्युलर जेल |तीर्थक्षेत्र झाले

उदोकार चाले |दास म्हणे               ६


सोमदत्त कुलकर्णी

©somadatta kulkarni

#snowpark

162 View

#snowpark  शीर्षक:  काय करावे?


विचारात हरवून गेलो 

काय करावे काही सुचेना

येता तुझी मुर्ती सामोरी

मज दुसरे काही दिसेना   १


तव स्वरूपात हरवलो

माझे काही ‌मुळी न राहिले

जळी काष्टी पाषाणी सर्वत्र

फक्त एक तुजला पाहिले   २


येतो पुन्हा तो नवा दिवस 

नवी आशा नी नवी उमेद

काय करावे नच सुचते

पण नाही होणार नाउमेद  ३


नाही येथे पर्याय कष्टास

श्रम करणे हे प्राप्त आहे

श्रम जीवी मम आयुष्यात

भगवान मी सदैव पाहे    ४

©somadatta kulkarni

#snowpark

207 View

Trending Topic