Ashvini Patil

Ashvini Patil

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #chaandsifarish  घाव सोसण्याचे बळ मिळाले असे काही
आज आसवांनाही मी आवडू लागले

प्राक्तनावरचा विश्वास दृढ असा काही
निंदकांचे शाप ही मग रडू लागले

गुंता साऱ्याचा आताशा सोडविते असा काही
हवे तसे म्हणूनच आता घडू लागले

करून विचार तुझा सदा असते मी आनंदी
हल्ली माझी मलाच मी सापडू लागले

स्वप्नांचे आभाळ ठेंगणे वाटते कधी कधी
तुझ्या आठवांच्या अंगणात आता मी बागडू लागले

©Ashvini Patil

#chaandsifarish

108 View

#मराठीशायरी #Barsaat  आज पुन्हा काळीज थरथरले जरासे
पावसाच्या थेंबाने शहारले जरासे

व्याकूळ माझे गीत मनीचे गाऊ दे जरासे
आर्त तुझ्या आठवणीने थिजले जरासे

स्वप्न तुझे नित्यच माझ्या नयनी 
स्वप्न सत्यात उतरण्या निजले जरासे

©Ashvini Patil

#Barsaat

117 View

#मराठीशायरी #TereHaathMein  माझ्यासाठी कुणी तरी जळनारा  पाहिजे
आठवणी मनात दाटून छळणारा पाहिजे

होतात आरोप लाख जेंव्हा चूक नसते काहीच 
ठामपणे बाजूस माझ्या वळणारा पाहिजे

मुके होतात ओठ अन मन होते सुन्न 
न सांगताच मनातले भाव कळणारा पाहिजे

 शब्दांच्या जखमांनी व्याकूळ  होते मी जेंव्हा
माझ्या अश्रूत विरघळणारा पाहिजे

©Ashvini Patil

#TereHaathMein

108 View

#मराठीशायरी #sad_shayari  White तुझ्या प्रेमाची भीक मी रीत्या ओंजळीत मागत गेले
उपाशी पोटी ही जगाला साऱ्या वाटत गेले

तुझ्याकडून नाहीच केली गुलाबाची अपेक्षा
वाटेतले काटेही मी केसात माळत गेले

हात सुटला तरी एकटीच मी चालत गेले
जन्मातरीचे बंध हे शृखलेप्रमाने तोडत गेले

तुझ्या मर्जी साठी कुस्करल्या कितीदा आत्मसन्मानाच्या पाकळ्या
मनात रोजच  मग नवे  हुंदके साठत गेले

येता जाता जो तो खुडतो मनाच्या नाजूक कळ्या
म्हणून मग मी ही त्यांचा रस्ता दुरूनच टाळत गेले

©Ashvini Patil

#sad_shayari

117 View

#मराठीशायरी #sad_shayari  White जीव जळतो आहे विरहात या 
हातात हात पुन्हा कशाला
वेड्याच त्या आणाभाका मग
आठवण्याचा तो परत गुन्हा कशाला
मनाचे दरवाजे ते डोळेच तर उघडतात
मनाला उगीच दोष देण्याचा बहाणा कशाला
तुझ्या आवाजातच बासुरीचे सप्त स्वर
बासुरी वाजवण्या मग गोकुळेचा कान्हा कशाला

©Ashvini Patil

#sad_shayari

90 View

होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर तूशार्त कर या अवनिला घेवून सरीच्या या कवेत भिजवून टाक तू रंध्रा रध्राला संध्याकाळचा होऊन पाऊस तू सूर लाव तू या उदासल्या अंगणाला तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे नकळत ओलचिंब करता या तनामनाला तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला ©Ashvini Patil

#मराठीशायरी #rain  होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर
तूशार्त कर या अवनिला
घेवून सरीच्या या  कवेत
भिजवून टाक तू रंध्रा रध्राला
संध्याकाळचा होऊन पाऊस तू 
सूर लाव तू या उदासल्या अंगणाला
तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे
नकळत ओलचिंब करता या तनामनाला
तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे
अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला

©Ashvini Patil

#rain

10 Love

Trending Topic