होऊन पाऊस तू ही कोसळ क्षणभर
तूशार्त कर या अवनिला
घेवून सरीच्या या कवेत
भिजवून टाक तू रंध्रा रध्राला
संध्याकाळचा होऊन पाऊस तू
सूर लाव तू या उदासल्या अंगणाला
तू आणि पाऊस ...साम्य दोघात फारसे
नकळत ओलचिंब करता या तनामनाला
तू आणि पाऊस...साम्य दोघात काहीसे
अवचित गाठून चिंब करता या व्याकूळ जीवाला
©Ashvini Patil
#rain