प्रेम काय आहे विचारलेस तर ?
तुझे फक्त नाव लिहिले त
  • Latest
  • Popular
  • Video

प्रेम काय आहे विचारलेस तर ? तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ? पुढे काय लिहिणार आहेस ? मनातले तेव्हा भाव लिहिले तर चालेल का ? इतक्यात अचूक जमेल का व्याख्या ? हळवे काहीसे घाव लिहिले तर चालेल का ? आजन्म एकत्र येणे कठीण नाही का ? तुझ्या काळजीचे स्वभाव लिहिले तर चालेल का ? किती दूरवर साथ देशील माझी ? स्वप्नांत बांधलेले गाव लिहिले तर चालेल का ? मी नाहीच म्हंटले तुला तर ? मिळविण्याची तुला हाव लिहिले तर चालेल का ? किती प्रेम करतोस माझ्यावर ? म्हंटले ना, तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

 प्रेम काय आहे विचारलेस तर ?
तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ?
पुढे काय लिहिणार आहेस ?
मनातले तेव्हा भाव लिहिले तर चालेल का ?
इतक्यात अचूक जमेल का व्याख्या ?
हळवे काहीसे घाव लिहिले तर चालेल का ?
आजन्म एकत्र येणे कठीण नाही का ?
तुझ्या काळजीचे स्वभाव लिहिले तर चालेल का ?
किती दूरवर साथ देशील माझी ?
स्वप्नांत बांधलेले गाव लिहिले तर चालेल का ?
मी नाहीच म्हंटले तुला तर ?
मिळविण्याची तुला हाव लिहिले तर चालेल का ?
किती प्रेम करतोस माझ्यावर ?
म्हंटले ना, तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ?

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

प्रेम काय आहे विचारलेस तर ? तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ? पुढे काय लिहिणार आहेस ? मनातले तेव्हा भाव लिहिले तर चालेल का ? इतक्यात अचूक जमेल का व्याख्या ? हळवे काहीसे घाव लिहिले तर चालेल का ? आजन्म एकत्र येणे कठीण नाही का ? तुझ्या काळजीचे स्वभाव लिहिले तर चालेल का ? किती दूरवर साथ देशील माझी ? स्वप्नांत बांधलेले गाव लिहिले तर चालेल का ? मी नाहीच म्हंटले तुला तर ? मिळविण्याची तुला हाव लिहिले तर चालेल का ? किती प्रेम करतोस माझ्यावर ? म्हंटले ना, तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

11 Love

Trending Topic