जाव कधीतरी समुद्र किनाऱ्यावर...
त्या लांबवर असलेल्या लाटांना जवळ बोलवून ,
बोलून बघाव त्यांच्याशीपण...
ती पायाखालून हळूच सरकत जाणारी वाळू ,जाणून घ्या व तिचही मत कधीतरी...
समुद्रात येणाऱ्या ओटीनाही विचारावा प्रश्न कधीतरी त्यांच्या अचानक येण्या मागचा ...
कुतूहल वाटत, त्या उंच -उंच असणाऱ्या नारळाच्या झाडांच ,किती शिस्तीत समुद्राचे राखण करत असतात...
वाटतं जणू शोधाव त्या मावळत्या सूर्याचे घर समुद्रात ,ज्याला मी बघते सांजवेळी मावळतांना समुद्रात खोलवर जाताना ...
खरंच वाटतं कधीतरी निसर्गालाही प्रश्न विचारावा...
विचाराव त्याच्या सौंदर्य मागचं कारण...
ज्याच्या सौंदर्याने मनुष्यालाही भुरळ पडते...
खरंच
जाव कधीतरी समुद्रकिनाऱ्यावर...
📝 प्रणाली इंग्रजीत73.
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here