रंग वेगळा होता...
जरा लाजून तू चिंब भीजली.
काळजात कडाडली बिजली...
सखे!तूझा भाव आगळा होता..
चेहर्या वरचा तूझ्या तो,रंग वेगळा होता..!!
आठवणीत तू सदैव निरंतर
हास्य तुझे ते जंतर मंतर.
सुंदर भाव विभोर शब्दांकित,
मोकळा गळा तो होता.
चेहर्या वरचा तूझ्या तो,रंग वेगळा होता....
गुलाब मखमली मोरपंखी
हिरवा,निळा,कुठला आणखी.
शाम धवल नटरंगी,
रंगाचा मळा होता.
चेहर्या वरचा तूझ्या तो,रंग वेगळा होता.
सजलेली रंगपंचमी
रंगात रंगली तू अलबेली,
समोर उभी तू नवी नवेली.
तुझ्या हाताने तू लावलेला
मजला टिळा तो होता.
चेहर्या वरचा तूझ्या तो,रंग वेगळा होता...!!
तु गेल्यावर शिमगा झाला,
मी बेरंग!हाताशी प्याला.
तूझ्या हातांना मात्र ,तोच लळा होता
चेहर्या वरचा तूझ्या तो,रंग वेगळा होता
तो रंग वेगळा होता......!!
@राहुल मोकळे,औरंगाबाद.
©Rahulm Mokle
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here