आकाशाची ती निळाई सागरात सांडलेली, रत्नाकारी तेजाने त्या तारकात प्रकाशली.. जरा आभाळ हासले बिंब सागरात पडे, मन तमात नभाचे.
1 Stories
Latest
Popular
Video
आकाशाची ती निळाई
सागरात सांडलेली,
रत्नाकारी तेजाने त्या
तारकात प्रकाशली..
जरा आभाळ हासले
बिंब सागरात पडे,
मन तमात नभाचे
सागराला उलगडे
पौर्णिमेचा चंद्र दिसे
आणि सिंधू तो उसळे,
नाते नेमके दोघांचे
कधी जगास न कळे
चंद्र झुकतो सागरी
प्रतिबिंब ते पाहण्या,
सोबतीला त्याच्या पहा
आल्या किती हो चांदण्या
रोहिणी पांडे, नांदेड
आकाशाची ती निळाई
सागरात सांडलेली,
रत्नाकारी तेजाने त्या
तारकात प्रकाशली..
जरा आभाळ हासले
बिंब सागरात पडे,
मन तमात नभाचे
सागराला उलगडे
पौर्णिमेचा चंद्र दिसे
आणि सिंधू तो उसळे,
नाते नेमके दोघांचे
कधी जगास न कळे
चंद्र झुकतो सागरी
प्रतिबिंब ते पाहण्या,
सोबतीला त्याच्या पहा
आल्या किती हो चांदण्या
रोहिणी पांडे, नांदेड
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here