Rohini Pande

Rohini Pande

  • Latest
  • Popular
  • Video

स्मरणगंधित त्या लाघव वेळा मोगऱ्यासम दरवळणाऱ्या, कुंतलात त्या माळताना तव स्पर्शात विरघळणाऱ्या..! मिठास मिठीची भारीच मिठी रोमांच तनावर येई न्यारा, क्षण धुंदीतले बेधुंदसे फुलतो मनाचा प्रीतपिसारा..! रंग प्रणयी मिठीत सजता तुझ्यात माझा विरघळ व्हावा, श्वास कंपने तनामनांची क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..! अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता ओढ मिठीची तुझ्या प्रवाही, अवीट मधुर प्रणयगंधाची मिळे मधु मिठीत ग्वाही.. रोहिणी पांडे

 स्मरणगंधित त्या लाघव वेळा
मोगऱ्यासम दरवळणाऱ्या,
कुंतलात त्या माळताना
तव स्पर्शात विरघळणाऱ्या..!

मिठास मिठीची भारीच मिठी
रोमांच तनावर येई न्यारा,
क्षण धुंदीतले बेधुंदसे 
फुलतो मनाचा प्रीतपिसारा..!

रंग प्रणयी मिठीत सजता
तुझ्यात माझा विरघळ व्हावा,
श्वास कंपने तनामनांची 
क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..!

अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता
ओढ मिठीची तुझ्या प्रवाही,
अवीट मधुर प्रणयगंधाची
मिळे मधु मिठीत ग्वाही..

      रोहिणी पांडे

मिठी दिनाच्या शुभेच्छा

12 Love

आकाशाची ती निळाई सागरात सांडलेली, रत्नाकारी तेजाने त्या तारकात प्रकाशली.. जरा आभाळ हासले बिंब सागरात पडे, मन तमात नभाचे सागराला उलगडे पौर्णिमेचा चंद्र दिसे आणि सिंधू तो उसळे, नाते नेमके दोघांचे कधी जगास न कळे चंद्र झुकतो सागरी प्रतिबिंब ते पाहण्या, सोबतीला त्याच्या पहा आल्या किती हो चांदण्या रोहिणी पांडे, नांदेड

#poem  आकाशाची ती निळाई
सागरात सांडलेली,
रत्नाकारी तेजाने त्या
तारकात प्रकाशली..

जरा आभाळ हासले
बिंब सागरात पडे, 
मन तमात नभाचे
सागराला उलगडे

पौर्णिमेचा चंद्र दिसे
 आणि सिंधू तो उसळे,
नाते नेमके दोघांचे
कधी जगास न कळे

चंद्र झुकतो सागरी
प्रतिबिंब ते पाहण्या,
सोबतीला त्याच्या पहा
आल्या किती हो चांदण्या
  
    रोहिणी पांडे, नांदेड

आकाशाची ती निळाई सागरात सांडलेली, रत्नाकारी तेजाने त्या तारकात प्रकाशली.. जरा आभाळ हासले बिंब सागरात पडे, मन तमात नभाचे सागराला उलगडे पौर्णिमेचा चंद्र दिसे आणि सिंधू तो उसळे, नाते नेमके दोघांचे कधी जगास न कळे चंद्र झुकतो सागरी प्रतिबिंब ते पाहण्या, सोबतीला त्याच्या पहा आल्या किती हो चांदण्या रोहिणी पांडे, नांदेड

16 Love

वागिश्वरी शारदे वर दे बेसुरी आयुष्याला स्वर दे।धृ। जागवं प्रतिभा अन काव्य नित्य स्फुरु दे भाव सात्विक साहित्यात ही रुजू रुजू दे शब्दास माझ्या वसंताचा फुलता बहर दे बेसुरी आयुष्याला स्वर दे...१ तू शारदा तेजस्वी कोमालांगी ज्ञानवती वीणापुस्तकधारिणी बुद्धिदात्री सरस्वती माझ्यात तुझ्या अस्तित्वाचा संस्कार दे बेसुरी आयुष्याला स्वर दे...२ सैरभैर समाजास तूच दिशा प्रकाश दे गोठलेल्या भावनांना तूच मुक्त आकाश दे साहित्य शब्द पेरणीस तूच गं आकार दे बेसुरी आयुष्याला स्वर दे..३ ©रोहिणी पांडे

#poem  वागिश्वरी शारदे वर दे
बेसुरी आयुष्याला स्वर दे।धृ।

जागवं प्रतिभा अन काव्य नित्य स्फुरु दे
भाव सात्विक साहित्यात ही रुजू रुजू दे
शब्दास माझ्या वसंताचा फुलता बहर दे

बेसुरी आयुष्याला स्वर दे...१

तू शारदा तेजस्वी कोमालांगी  ज्ञानवती
वीणापुस्तकधारिणी बुद्धिदात्री सरस्वती
माझ्यात तुझ्या अस्तित्वाचा संस्कार दे

बेसुरी आयुष्याला स्वर दे...२

सैरभैर समाजास तूच दिशा प्रकाश दे
गोठलेल्या भावनांना तूच मुक्त आकाश दे
साहित्य शब्द पेरणीस तूच गं आकार दे

बेसुरी आयुष्याला स्वर दे..३

      ©रोहिणी पांडे

वागिश्वरी शारदे वर दे बेसुरी आयुष्याला स्वर दे।धृ। जागवं प्रतिभा अन काव्य नित्य स्फुरु दे भाव सात्विक साहित्यात ही रुजू रुजू दे शब्दास माझ्या वसंताचा फुलता बहर दे बेसुरी आयुष्याला स्वर दे...१ तू शारदा तेजस्वी कोमालांगी ज्ञानवती वीणापुस्तकधारिणी बुद्धिदात्री सरस्वती माझ्यात तुझ्या अस्तित्वाचा संस्कार दे बेसुरी आयुष्याला स्वर दे...२ सैरभैर समाजास तूच दिशा प्रकाश दे गोठलेल्या भावनांना तूच मुक्त आकाश दे साहित्य शब्द पेरणीस तूच गं आकार दे बेसुरी आयुष्याला स्वर दे..३ ©रोहिणी पांडे

16 Love

प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी) आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१ प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२ ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३ कंट खोल आरपार,रुतलेले काळजात दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४ प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५ रोहिणी पांडे, नांदेड वर्ण-१६

 प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी)

आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा
नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१

प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना
दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२

ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना
नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३

कंट खोल आरपार,रुतलेले काळजात
दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४

प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा
पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५

      रोहिणी पांडे, नांदेड

वर्ण-१६

प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी) आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१ प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२ ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३ कंट खोल आरपार,रुतलेले काळजात दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४ प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५ रोहिणी पांडे, नांदेड वर्ण-१६

4 Love

आठवणींचे हिंदोळे नित्य हृदय स्पंदनी, तव प्रीतभाव मनी श्वास लय कंपनी रोहिणी पांडे

#poem  आठवणींचे हिंदोळे
नित्य हृदय स्पंदनी,
 तव प्रीतभाव मनी
श्वास लय कंपनी

     रोहिणी पांडे

आठवणींचे हिंदोळे नित्य हृदय स्पंदनी, तव प्रीतभाव मनी श्वास लय कंपनी रोहिणी पांडे

1 Love

रोही पंचाक्षरी °°°’°°°°°°°°°°°°° तुझ्या ध्यासात धुंद प्रेमात क्षण सुगंधी तुझ्या माझ्यात रोहिणी पांडे

#poem  रोही पंचाक्षरी
°°°’°°°°°°°°°°°°°
तुझ्या ध्यासात
धुंद प्रेमात
क्षण सुगंधी
तुझ्या माझ्यात

   रोहिणी पांडे

रोही पंचाक्षरी °°°’°°°°°°°°°°°°° तुझ्या ध्यासात धुंद प्रेमात क्षण सुगंधी तुझ्या माझ्यात रोहिणी पांडे

8 Love

Trending Topic