*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️*
सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली,
स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली...
जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल,
तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल...
मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला,
रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला...
दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी,
त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी...
वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा,
बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा...
मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते,
असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते...
शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून,
मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून...
तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल,
त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल...
त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा,
गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा...
⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे,
स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️
©मयुर लवटे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here