Relationship - Part II
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खुप दिवसांनी लेख लिहिण्याचा योग आला. माझा जुना Relationship नावाचा एक लेख आहे, त्याचाच एक भाग पण एक वेगळा अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. माझ्या मते, फक्त एकत्र राहणं म्हणजे प्रेम नसतं, तर समजून घेणे, एकमेकांना मदत करणे, आणि वेळ पडली तर समोरच्या व्यक्तीला कायमचं जाऊन देणे पण प्रेमच असतं. आपल्याला नेहमी असं वाटतं की, काहीही झालं तरी सोबत राहणं म्हणजेच प्रेम आहे, पण ही गोष्ट खरी आहे की ती फक्त आपली सत्य न स्विकारण्याची अकार्यक्षमता आहे?
आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या Roads to Renewal ह्या उपक्रमात मी एका मुलासोबत बोलताना, एक गोष्ट जाणवली. तो मुलगा एकटेपणामुळे त्रासला होता आणि त्याने एका मुलीवर केलेल्या प्रेमातून पुढे निघत नव्हता. त्याने मला एक प्रश्न विचारला की, जर पुढील व्यक्तीचे माझ्यावर प्रेम होते तर मग नंतर त्याने मला का सोडले? मी त्याला इतकचं समजावलं की, जर कोणी तुझ्याशिवाय आनंदी राहत असेल तर तुला त्या व्यक्तीला धरून ठेवण्याचा काय अधिकार आहे? बाकी जे झालं त्याचा विचार करत राहण्यात काही अर्थ नाही.
माझ्या मते, प्रेमाबद्दल सगळ्यात मोठं सत्य हे आहे की, जर तुमच्या असण्याने समोरच्या व्यक्तीला आनंद होत नसेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातुन बाजूला होणं हीच त्याच्यासाठी फार मोठी भेट आहे. प्रेम म्हणजे एखाद्यावर तुमच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणने नाही तर त्यांच आयुष्य आपल्याशिवाय सुकर होत असेल तर त्यांना मोकळं सोडून देणं हे आहे. हे खरं आहे की, हे सर्व करताना दुःख होईल पण फक्त अपराधीपणाची भावना, कर्तव्य किंवा दया अशा गोष्टींचा वापर करून त्यांना बांधून ठेवणे, त्या दुःखापेक्षा वाईट नाही का?
(Next Page.....)
©ankit
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here