प्रेमाची सगळ्यात मोठी परिक्षा ही तुम्ही ते किती वेळ थांबवून ठेवता ही नसून किती चांगल्या प्रकारे सोडून देतात ही आहे. तुम्ही सोडून दिले म्हणजे तुम्ही प्रेम करत नव्हता असं नाही, तर तुम्ही इतकं प्रेम केलं की तुम्हाला तुमच्या दुःखापेक्षा समोरच्याचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा की, प्रेम हे प्रत्येक वेळी शेवटपर्यंत राहील असं नाही तर आपल्याला काही शिकवून निघून जाईल, ही गोष्ट समजून घेणे होय.
मला माहिती आहे, बोलायला जितकं सोपं आहे तितकं करायला नाही आहे, जर आपण अडकून पडलेलो असताना समोरचा निघून जातो त्याचही दुःख होतं, ज्याला आपण कायमचं समजलं ते तात्पुरतं होतं हे स्विकारणंही अवघड असतं पण जितक्या लवकर तुम्ही सत्य स्विकारणार, तितकं लवकर तुम्ही यातून बाहेर पडशाल.
जाता जाता एवढंच सांगेन की, एखाद्यावर प्रेम करणं खूप सुंदर गोष्ट आहे, त्यांना गमावणे हिदेखील खूप त्रासदायक गोष्ट आहे, पण ते मनाने निघून गेलेले असताना त्यांना थांबवून ठेवणे हा तुम्ही तुमच्या स्वतःवर व समोरील व्यक्तीवर केलेला सर्वात मोठा अन्याय आहे.
त्यांना आदरपूर्वक जाऊ द्या. तुम्हाला रडायचंय, रडा. ओरडायचंय, ओरडा, पण हे सगळं होत असताना स्वतःला हरवू देऊ नका. कारण जेव्हा भविष्यात कधी तुम्ही मागे वळून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, जे तुमच्यासाठी व समोरच्या व्यक्तीसाठीही योग्य होतं, तेच झालं.
आणि हेच प्रेम आहे, हाच त्याग आहे, आणि हाच नात्यातील अवघड पण सर्वात पवित्र भाग आहे. बाकी एखाद्या गोष्टीचा जर राग आला असेल तर त्यावर विचार करा, कारण सत्य हे कटूच असतं.
@Ankit_19
©ankit
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here