White ❤️ माणुसकी ❤️
लोकांचे सुख नाही समजले तरी चालेल,
पण त्यांच्या वेदना समजल्या पाहिजे,
हसऱ्या चेऱ्यामागील टेन्शन समजलं पाहिजे,
त्यांच्या मनाची धडपड व्यथा समजली पाहिजे,
एक वेळ श्रीमंतीच्या यादीत नंबर नाही बसला तरी चालेल,
पण माणुसकीच्या यादीत नंबर बसला पाहिजे,
लोक ब्रॅण्डेड कपड्याने, सुंदर चेहऱ्याने ओळखत नाहीत,
सुंदर मनाने आणि स्वभावाने ओळखतात,
शेवटी काय हो.....
माणूस म्हणून नाही जगला तरी चालेल,
माणुसकी म्हणून जगता आलं पाहिजे..
कवी मन झाले शब्दातून शब्द आठवले,
सचिन सुकम
©sachin sukam
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here