गावदेवीचा शिमगा
गावदेवीच्या होळीला जाऊया चला,
शिमग्याच्या या सणाला तिला भेटूया चला,
सडा ,रांगोळी काढून घराची सजावट करू,
गावदेवीच्या आगमनासाठी फुलांचा वर्षाव करू,
गावदेवी आपल्या घरी आली आहे पहा,
आतुरतेने आपली वाट पाहत आहे पहा ,
शिमगा हा कोकणचा सण आहे मोठा,
देवीची पालखी नाचवण्यात वेगळीच मजा,
लहान मोठे गावदेवीला साकडे हो घालतात,
दिंड्या पताका पालखी घेऊन घरोघरी जातात,
शिमगा उत्सव मोठ्या हर्षाने साजरा करतात,
ओठ्या ,नारळ भरून नृत्य ,भजन करून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात,
गावदेवीच्या आगमनाने स्वर्ग जणू जमिनीवर येतो,
तिच्या पावन स्पर्शाने कोकण स्वर्गमय होतो,
पंधरा -सोळा दिवसांनी देवी राजगणात जाते,
झालेली सेवा पाहून स्वतः अश्रू गाळते,
भक्तांपेक्षा तिलाच जास्त लगबग लागते,
कधी वर्ष होईल आणि पुन्हा येईल असे तिला होते,
गावदेवीच्या होळीला जाऊया चला.....
सर्व कोकण वाशीयांना समर्पित
कवी मन झाले शब्दातून शब्द आठवले,
सचिन सुकम
©sachin sukam
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here