White मला यात शंकाच नाही की,
माझा देश स्वतंत्र आहे....
माझा देश खरंच स्वतंत्र आहे का?
मला यातच शंका आहे
महिलांवर होणारे हिंसाचार, आत्याचार
सगळं अजूनही तसचं चालू आहे
मग सांगा पाहू तुम्हीच, कसं म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री स्वबळावर सक्षम तर झाली
पण पुरुषी अंहकार तसाच शिल्लक आहे
मग आपण कसे म्हणू शकतो की,
माझा देश स्वतंत्र आहे....
स्त्री शिक्षित होऊनही
बंधनात कायम अडकलेलीच आहे
जरा वेषभूषात बाहेर पडली की,
पुरुषी एकटक नजरा अजूनी झेलते आहे
वर्तमानपत्रात रोजच ती च्या विषयी
छापलेलं एकतरी पान आहे
स्वातंत्र्याच्या या दुनियेत कसं म्हणावं
माझा देश स्वतंत्र आहे....
जेंव्हा स्त्री स्वतंत्र होईल ना
तेंव्हाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल
माझा देश स्वतंत्र आहे....
©Vilas Bhoir
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here