White एक थरथरते शिडी अन् वेगळा पडतो असर
कोण ढासळतो, कुणाची मात्र गच्चीवर नजर
आजही सगळे सुरू आहे जसे होते तसे
राहिल्या ना फक्त पहिल्या सारख्या इच्छा जबर
व्हायचे तादात्म्य इतके की मिटावी नग्नता
शेवटी होवोत अपुले देह उघडे फार तर
कोणत्या निद्रेत दुनिये पहुडली आहेस तू
काय ह्याचे मी करू, कोणास देऊ हा बहर
शेवटी आलीच बागेवर नको ती आपदा
फुल बहरले नेमके अन् आंधळा झाला भ्रमर
याहुनी काहीच नाथा वेगळे नाही पुढे
तेच ते आता नव्याने उलगडत जातील थर
.
.
(काय वर्णावी घराने ह्या कलेची थोरवी
लावला आहे चुना पण वाटतो संगमरवर )
एकनाथ
©Eknath Dhanke
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here