White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा
क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा
असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते
हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा
एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता
रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा
माझी सोबत जी काही होती ती इथवर होती
इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा
कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा
अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा
(नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही
ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा)
एकनाथ
©Eknath Dhanke
#Night