English
Unsplash #कधी कधी.... शब्दवेडा किशोर कधी कधी.. बेभान जगावं एकांतात मनमुराद हसावं एकांतात मोकळेपणानं रडावं एकांतात स्वतःला पूर्णपणे सावरावं एकांतात आसवांना आवरावं एकांतात स्वतःला ओळखावं एकांतात दुखावलेल्या जुन्या नव्या जखमांचा सारा हिशोब सुद्धा मांडावा एकांतात स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक लिहावं एकांतात स्वतःला जगवावं एकांतात नवी स्वप्नं पाहून बघावी एकांतात आयुष्याचा सारीपाट खेळून बघावा एकांतात.. एक एकट्याचा एकट्यासाठीचा एकटा एकांत शिकवतो आपणास धडे आयुष्याचे....एकांतात.... कधी कधी.... ©शब्दवेडा किशोर
शब्दवेडा किशोर
11 Love
White #मायबोली मराठी.... शब्दवेडा किशोर माझी मायबोली भाषा मराठी लाविते मनास अभिलाषा मराठी संवाद साधता होत नसे निराशा ती असे माझ्या महाराष्ट्राची शान मराठी असे आम्हांस सदैव अभिमान तिचा दुर सर्व देशी होई सन्मान अशी ती महान माझी राजभाषा भाषा मराठी मला असते तिची आस अन् आहे तिच माझी सुखाची रास व माझ्या जगण्याचा विश्वास माझी मायबोली मराठी काना मात्रा वेलांटी आकार ऊकार रस्व व दिर्घ विराम स्वल्पविराम पुर्णविराम उदगारवाचक अशा अनेक चिंन्हानी बहरलेली खुललेली माझी मायबोली मराठी खरंच..जरी मावशी म्हणून स्वतःस जगी मिरविते इंग्रजी भाषा माझ्या मायबोलीची तरी शपथ तुम्हाला आहे सात समुद्रापल्याडदेखील सन्माननिय वंदनीय अशी माझी लाडकी मराठी भाषा आहे धन्य झाले प्राक्तन माझे झाली माझी मायमाऊली मराठी गर्व वाटतो सदा मलाच माझा बोलतो मी माझी मायबोली मराठी माझे बोल माझे शब्द माझे गीत माझे बालकडू मराठी माझे शिक्षण माझे मनन माझे वतन माझे आत्मचिंतन माझे राष्ट्र मराठी माझी शांतता माझा विद्रोह माझं व्यक्तपण माझं कर्तेपण मराठी माझं तत्व माझं सत्व माझी मायबोली मराठी अजि म्या धन्य जाहलो जन्माने घेतले मी स्वरूप मराठी जाहला माझा देह पावन दास जिचा जाहलो जन्माने मी अशी अगाध लीला जिची ती सर्वसुवर्णसंपन्न भाषा माझी मायबोली मराठी ©शब्दवेडा किशोर
9 Love
White #एक वादळाची वाट...... शब्दवेडा किशोर आयुष्यात अचानक उठणारी ही वादळं फार भयंकर असतात.घोंगावत्या या वादळात विचारांचा कचरा होतो अन् मनातला हा पालापाचोळा आपल्या भोवती आपल्यालाच गरागरा फिरवतो. जेव्हा ही वादळं क्षमतात तेव्हा आपलं सारं अस्तित्व तुटलेलं,भंगलेलं अन् पूर्णपणे विखूरलेलं असतं अन् मग आपसूक मन पुन्हा नव्यानं तोच पालापाचोळा वेचायला लागतं.. आयुष्यात नव्याने येणाऱ्या वादळांच्या तयारीसाठी.... ©शब्दवेडा किशोर
12 Love
White #रित्या मनाची ओंजळ.... शब्दवेडा किशोर खुप सारं साठवून ठेऊन मात्र अखेर एकदा आभाळ बरसलं भावनांनी मनाचा उंबरठा ओलांडावा असं म्हणलं नभीच्या धारांना त्या धरेची अतृप्त ओढ होती उंबऱ्यातल्या मनाच्या मोकळ्या आकाशाची जणू त्यांना आस होती जव अतृप्त त्या ओढीनं आलेला एक गच्च मिठी मारून मनीचा तो ऊंबरठा ओलांडला तव अनाहूतपणे भावनांच्या सरी बेभान होऊन मुक्त झाल्या अन् दोघांचीही अशांत मनं पुरती क्षमली होती आताच कुठंतरी दोघांचीही ती रित्या मनाची ओंजळ छान सुखांच्या सरींनी पूर्ण भरली होती ©शब्दवेडा किशोर
14 Love
White माझ्या आयुष्यात मला सगळीच चांगली माणसं भेटलीय.. मी सोडून कुणीच इथं कधीच चुकत नाही.... शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर
White #नात्यांची जहरी नाळ.... शब्दवेडा किशोर रोज माझ्या उशाला शापित अन् विखारी माझ्याच भूतकाळाच्या आठवांचा काळ सावळीसम माझ्या संगतीस आहे ओठावर नात्यांच्या ओळखीचे नाव अन् डोळ्यात विरहजाळासोबत अजूनही हा गर्दीमय एकटेपणाचा अवघड असा शाप आहे जगण्यासोबतच आता झोपही माझी विझूनी गेलीय तरीही हाती अजूनही स्वप्नांचा तोच लाजिरवाणा सांभाळ आहे हक्काची नाती आयुष्यातून झाली काही काळाआधीच वजा विरली ती त्याला चांदण्यात जरी माझे अजूनही आतुरलेले फाटके अन् रिते कोरडे ते आभाळ आहे नाते सारे भावनांचे इतके सुलभ नसतात हे शिकवणारं माझं दरिद्री भाळ आहे अन् अजूनही कुठंतरी एक अंधुकशी शापित माझ्याशी जोडलेली या साऱ्याची एक जहरी नाळ आहे ©शब्दवेडा किशोर
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here