English
Words are my ultimate expression..
सोयरी पंढरी, सावळा श्रीहरी.. भेटो चराचरी, ऐसी घडो वारी! ऐसी घडो वारी! दान येवो घरी ज्ञानोबा तुक्याचे, नामा चोखोबाही वाट दावी! रामदासी राम मिरीयेसी श्याम, तैसा विठु माझ्या दाटू येवो उरी! सुखाचे हे सुख ओतूनी उरावे, पुन्हा मी संसारी परतलो जरी! सोयरी पंढरी, सावळा श्रीहरी.. भेटो चराचरी, ऐसी घडो वारी! ऐसी घडो वारी! - वैभवी ✒️ 7-11-23 © Vaibhavi
Vaibhavi
12 Love
तुला आठवावे निळ्या सांजकाळी, तू डोळे भरुनी मला साठवावे! तुझ्या गावचा मेघ तू पाठवावा, इथे ऊन भांबावुनी ओसरावे.. असा दाटू ये हुंदका अंबरा, तू इथे, मी तिथे, आज बरसून जावे! तुला पाहण्या तारका जागल्या, चंद्रही मागची पौर्णिमा जागू पाहे.. पुन्हा जागतो रात्र मी एकटी, तू ही स्वप्नात तुझिया मला जागवावे! -वैभवी. © Vaibhavi
8 Love
मी ओहोटीची लाट होऊन, तुला सामावून घेईन संपूर्ण.. तू ओळखीच्या किनाऱ्यासारखा, सकाळी कुशीत घे फक्त! © Vaibhavi
7 Love
Music quotes Dear Music, All I have to express my love and gratitude towards you are these dry, plain words! Neither I have a skilled sweet voice nor do my fingers know playing any instrument. Even then, I live you! Through my ears listening to the masterpieces, my heart absorbing sheer goodness, my mind blowing with the vibe, and my pen translating those melodies!🎼✒️♥️ Thankyouu for making me dream of being a lyricist! And being my companion, literally! I Love You!❤ © Vaibhavi
कवितेस माझ्या छंद तुझा रे, गंध तुझा, आवंढ तुझा.. लहर तुझी, व्यापते तिलाही, रंग तुझा, व्यासंग तुझा! माझी लेखणी, कागद माझा, बंध तुझा, अनुबंध तुझा.. शाई भिनते नसांत माझ्या, वेध तुझा, आवेग तुझा! माझी वही, माझीच स्वाक्षरी, शोध तुझा, आनंद तुझा.. तू हासून म्हणशी कणाकणांतून, "देह तुझा, अन मी ही तुझा!" © Vaibhavi
9 Love
"तू नसताना" रिमझिम रिमझिम पाऊस धारा, झरझर झरझर गार वारा.. शहारूनी जातो मनाला.. तू नसताना,का खेळ हा? तू असताना, वाटे हवा हवा! मोरपंख रेशमी, स्पर्श मखमली तू समोर माझिया, की ही सावली? तुझी ओढ लागे जीवाला.. तू असताना, धुंद ही निशा तू नसताना, ही तुझी नशा! अलगुज वाजे कानी, श्याम मेघ अस्मानी ही निळाई वेढते जीवा.. दवबिंदू गर्द पानी, कैफ त्यात हा रुहानी चांदरात मोहवी मना.. तू असताना, रंग मैफिलीला तू नसताना, होई सुना सुना! तू हवीस जीवनी, स्वप्न कोवळे हाक माझी ऐकती, मेघ सावळे तुझा ध्यास लागे मनाला.. तू असताना, हा जीव भारलेला तू नसताना, तो होई बावरा! -वैभवी कुलकर्णी. © Vaibhavi
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here