"तू नसताना"
रिमझिम रिमझिम पाऊस धारा,
झरझर झरझर गार वारा..
शहारूनी जातो मनाला..
तू नसताना,का खेळ हा?
तू असताना, वाटे हवा हवा!
मोरपंख रेशमी, स्पर्श मखमली
तू समोर माझिया, की ही सावली?
तुझी ओढ लागे जीवाला..
तू असताना, धुंद ही निशा
तू नसताना, ही तुझी नशा!
अलगुज वाजे कानी,
श्याम मेघ अस्मानी
ही निळाई वेढते जीवा..
दवबिंदू गर्द पानी,
कैफ त्यात हा रुहानी
चांदरात मोहवी मना..
तू असताना, रंग मैफिलीला
तू नसताना, होई सुना सुना!
तू हवीस जीवनी, स्वप्न कोवळे
हाक माझी ऐकती, मेघ सावळे
तुझा ध्यास लागे मनाला..
तू असताना, हा जीव भारलेला
तू नसताना, तो होई बावरा!
-वैभवी कुलकर्णी.
© Vaibhavi
#droplets