White कळत नाही काय करावे, तू अशी रुसल्यावर,
जवळ कसे घेऊ तुला, तू जवळ नसल्यावर...
येईल आसू नयनी जर, खुशाल येऊदे की,
हसायचे असते पुढे तर रडून घ्यावे खचल्यावर...
दिवस सरला बघ असा, तुझ्या अबोल्यात अख्खा,
कधी जाईल रुसवा, रात्र अख्खी सरल्यावर??
मला ठाव आहे सखे, हसू आणायचे कुठून,
खुलतो ना चेहरा तुझा, नभी चंद्र दिसल्यावर...
असं तृप्त होऊन जावं तरी हट्ट शेवटी धरावास,
"तू ही पहावं चंद्राला तिथे, मी पहात बसल्यावर..."
आज मनसोक्त पाहून घे, पूर्ण चंद्राला तिथे तू
"मला चंद्र हवा कशाला, तुझा फोटो असल्यावर..."
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#moon_day