बा, विठ्ठला मनाच्या पंढरीनेही
एकदा उघडू दे नव्या आशेचे दार
रिंगणातून त्याच्याही दवडू दे
अश्व प्रेम,आपुलकीचा ..
गरीब-श्रीमंत,जात-पात
या सगळ्याचा विसर पडणार्या
वैष्णवांचे वसू दे तेथेही घर...
यातनांच्या अंधारात गुरफटलेल्या,
विश्वासघाताच्या आगीत होरपळलेल्या
जिवाला तूच घे माय -माऊली बनून कुशीत...
दे आता तूच पाठबळ
त्याला नवचैतन्याचा टाळ घालून गळ्यात ...
वैराग्याच्या भीतीने भेदरलेल्या
जिवाच्या भेगाळलेल्या मनाच्या
जमिनीवर पडू दे एकदा
जिद्दीचा,आत्मविश्वासाचा आषाढी पाऊस...
फसलेली नाती , चुकलेल्या वाटा मागे टाकून.
.आशेने धरलेल्या नवीन वाटेवर
मिळू दे प्रेम, आनंदाने भरलेला वारकरी सहवास..
_sensitive_ink_
©Dr. BHAGYASHRI