White तिने काय स्वप्न बघितले माहिती नाही
मी मात्र रोज नवनवीन स्वप्न बघत असतो
सोबतीने आयुष्य कसं जगायचं दोघेही
रोज ह्याच योजना करत असतो...
सिनेमातल्या प्रत्येक चित्रात
मी आमचं आयुष्य शोधत असतो
तीच माझी राधा आणि रुक्मिणीही तीच
मी स्वतःमध्ये कृष्ण शोधत असतो...
संसार थाटायचा आम्ही दोघांनी मिळून
म्हणून प्रेमाचा सुखद प्रवास अनुभवत असतो
तिच्या सोबतीने सुखदुःखात आयुष्य काढण्याचा
मी रोजच स्वप्न बघत असतो...
अगदी सुखात ठेवायचंय तिला
म्हणून नको ते प्रयत्न करत असतो
ती कायमची माझी कधी होईल
रोज याच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो...
हवं ते करायचंय तिला आनंदी ठेवण्यासाठी
आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो
तिने काय स्वप्न बघितले भविष्याचे माहित नाही मला
मी मात्र सोबत जगण्यामरण्याचे रोज स्वप्न बघत असतो...
ती म्हणेल ते करीन म्हणेल तसं वागेन
मनातल्या मनात तिला हेच वचन देत असतो
देवा फक्त एकदा तिला माझी होऊ दे कायमची
हिच प्रार्थना प्रत्येक देवाजवळ क्षणोक्षणी करत असतो...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#life_quotes poetry lovers poetry love poetry for her poetry quotes