White अस्तित्व.. शब्दवेडा किशोर हाताची घडी घालून स | मराठी कविता

"White अस्तित्व.. शब्दवेडा किशोर हाताची घडी घालून समुद्राच्या काठावर बसून तुझाच विचार करत बसतो येणारी प्रत्येक लाट तुझ्या आठवणींच्या खुणा ओल्या करत राहते अन् मी भिजलेल्या त्या वाळूमध्ये अजूनही तुझ्याच मैत्रीचा सुगंध शोधत असतो हातातल्या त्या ओल्या वाळूचा गोळा आपल्या घट्ट मैत्रीची मज सदा जाणीव करून देतो त्या ओल्या वाळूचा स्पर्श तुझाच आपलेपणा मज भरभरून सुखावून देतो...... रुजणाऱ्या मातीमध्ये तू घट्ट उभी आहे पण माझ्या निखळ मैत्रीच्या लाटेत कधीतरी तुझी पकड सुटत आहे स्वतःला सावरण्याचा नादात माझ्या मैत्रीला दुरावलंस तू माझ्या मैत्रीचे तुषार कधीतरी अंगावर झेलशील तू कधीतरी माझ्या मैत्रीला पुन्हा शोधशील तू परत तुझी पावलं वळतील माझ्या मैत्रीकडे अन् आपसूक आपुलकीचे दोन शब्द बोलशील तू...... रुजवायच्या मातीत घट्ट उभी राहून तु माझ्या मैत्रीला दुरावशील अन् माझ्या मैत्रीच्या लाटेत तुझ्या पायाखालची मातीही मग आपसूक विरघळेल तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे मला नात्यांची बंधनं खुप आहेत तुला स्त्री चं आयुष्य विस्तवासारखं असतं स्वतः चटके सहन करून सदात्यांना नात्यांच्या बंधनांना सांभाळायचं असतं...... मनातला आक्रोश व्यक्त करताना तुझं मन दुखावतो मी काय सांगू तुला मैत्रीत हरवलेल्या माझ्या मनाला खुप समजावतो मी...... नात्याची कोडी उलगडताना आपल्या मैत्रीचं कोडं थोडं किचकट झालं भावनांचा पुर येणं व अस्तित्व ओघळून त्यात स्वतःला हरवून बसणं अन् कशाचीच उत्तरं न सापडणं आता माझ्या आयुष्यात नित्यनियमाचंच झालं आहे...... ©शब्दवेडा किशोर"

 White अस्तित्व..
शब्दवेडा किशोर
हाताची घडी घालून समुद्राच्या काठावर बसून तुझाच विचार करत बसतो
येणारी प्रत्येक लाट तुझ्या आठवणींच्या खुणा ओल्या करत राहते
अन् मी भिजलेल्या त्या वाळूमध्ये अजूनही तुझ्याच मैत्रीचा सुगंध शोधत असतो
हातातल्या त्या ओल्या वाळूचा गोळा
आपल्या घट्ट मैत्रीची मज सदा जाणीव करून देतो
त्या ओल्या वाळूचा स्पर्श तुझाच आपलेपणा मज भरभरून सुखावून देतो......
रुजणाऱ्या मातीमध्ये तू घट्ट उभी आहे
पण माझ्या निखळ मैत्रीच्या लाटेत
कधीतरी तुझी पकड सुटत आहे
स्वतःला सावरण्याचा नादात
माझ्या मैत्रीला दुरावलंस तू 
माझ्या मैत्रीचे तुषार कधीतरी अंगावर झेलशील तू
कधीतरी माझ्या मैत्रीला पुन्हा शोधशील तू
परत तुझी पावलं वळतील माझ्या मैत्रीकडे अन्
आपसूक आपुलकीचे दोन शब्द बोलशील तू......
रुजवायच्या मातीत घट्ट उभी राहून
तु माझ्या मैत्रीला दुरावशील
अन् माझ्या मैत्रीच्या लाटेत तुझ्या
पायाखालची मातीही मग आपसूक विरघळेल 
तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे मला
नात्यांची बंधनं खुप आहेत तुला
स्त्री चं आयुष्य विस्तवासारखं असतं
स्वतः चटके सहन करून सदात्यांना
नात्यांच्या बंधनांना सांभाळायचं असतं......
मनातला आक्रोश व्यक्त करताना
तुझं मन दुखावतो मी
काय सांगू तुला मैत्रीत हरवलेल्या
माझ्या मनाला खुप समजावतो मी......
नात्याची कोडी उलगडताना
आपल्या मैत्रीचं कोडं थोडं किचकट झालं
भावनांचा पुर येणं व अस्तित्व ओघळून
त्यात स्वतःला हरवून बसणं अन्
कशाचीच उत्तरं न सापडणं आता
माझ्या आयुष्यात
नित्यनियमाचंच झालं आहे......

©शब्दवेडा किशोर

White अस्तित्व.. शब्दवेडा किशोर हाताची घडी घालून समुद्राच्या काठावर बसून तुझाच विचार करत बसतो येणारी प्रत्येक लाट तुझ्या आठवणींच्या खुणा ओल्या करत राहते अन् मी भिजलेल्या त्या वाळूमध्ये अजूनही तुझ्याच मैत्रीचा सुगंध शोधत असतो हातातल्या त्या ओल्या वाळूचा गोळा आपल्या घट्ट मैत्रीची मज सदा जाणीव करून देतो त्या ओल्या वाळूचा स्पर्श तुझाच आपलेपणा मज भरभरून सुखावून देतो...... रुजणाऱ्या मातीमध्ये तू घट्ट उभी आहे पण माझ्या निखळ मैत्रीच्या लाटेत कधीतरी तुझी पकड सुटत आहे स्वतःला सावरण्याचा नादात माझ्या मैत्रीला दुरावलंस तू माझ्या मैत्रीचे तुषार कधीतरी अंगावर झेलशील तू कधीतरी माझ्या मैत्रीला पुन्हा शोधशील तू परत तुझी पावलं वळतील माझ्या मैत्रीकडे अन् आपसूक आपुलकीचे दोन शब्द बोलशील तू...... रुजवायच्या मातीत घट्ट उभी राहून तु माझ्या मैत्रीला दुरावशील अन् माझ्या मैत्रीच्या लाटेत तुझ्या पायाखालची मातीही मग आपसूक विरघळेल तुझ्या परिस्थितीची जाणीव आहे मला नात्यांची बंधनं खुप आहेत तुला स्त्री चं आयुष्य विस्तवासारखं असतं स्वतः चटके सहन करून सदात्यांना नात्यांच्या बंधनांना सांभाळायचं असतं...... मनातला आक्रोश व्यक्त करताना तुझं मन दुखावतो मी काय सांगू तुला मैत्रीत हरवलेल्या माझ्या मनाला खुप समजावतो मी...... नात्याची कोडी उलगडताना आपल्या मैत्रीचं कोडं थोडं किचकट झालं भावनांचा पुर येणं व अस्तित्व ओघळून त्यात स्वतःला हरवून बसणं अन् कशाचीच उत्तरं न सापडणं आता माझ्या आयुष्यात नित्यनियमाचंच झालं आहे...... ©शब्दवेडा किशोर

#अस्तित्व

People who shared love close

More like this

Trending Topic