विषय: भक्ती रंग
पांडुरंगा एक देई
वरदान मज देवा
अंतर्बाह्य रंग कसा
फक्त भक्तीचा असावा १
भक्ती रंगात गोपीका
सर्व जग विसरल्या
नाही काही भान आता
हरी प्रेमे गुंग झाल्या २
भक्ती रंगात हरिच्या
गेली द्रौपदी रंगून
प्रेम बघून कृष्णेचे
आला श्रीकृष्ण धावून ३
कृष्ण कृष्ण नाम घेता
मीरा कृष्णात रंगली
तन मन विसरूनी
कृष्ण प्रेमात बुडाली
©somadatta kulkarni