White खरं सांगू? शाळेचे ते दिवसच छान होते, "आज काय | मराठी Poetry

"White खरं सांगू? शाळेचे ते दिवसच छान होते, "आज काय घालू?" असले विचार मनी नव्हते! एकच गणवेश सर्वांना, वर्ग परिवार होता जणू आता लक्षात येतं, जेव्हा मागे वळून पाहते... आठवतं खेळाचं मैदान, मैदानावरचा गोंधळ, पकडापकडी खेळताना हातात हात होते, चिंता नव्हती घड्याळाची, ना पाऊस पाण्याची झळ, आता खुद्द वेळच हात धरुन मागे लागते! शाळेचा एकही दिवस चुकवला नाही कधी, आता कुठे दिवसभर बाहेर पडावेसे वाटते? मोठे झालो तसे सारे भरकटत गेलो, 'आज' नाही, पाऊल उद्यात गुरफटत राहते! ©Anagha Ukaskar "

White खरं सांगू? शाळेचे ते दिवसच छान होते, "आज काय घालू?" असले विचार मनी नव्हते! एकच गणवेश सर्वांना, वर्ग परिवार होता जणू आता लक्षात येतं, जेव्हा मागे वळून पाहते... आठवतं खेळाचं मैदान, मैदानावरचा गोंधळ, पकडापकडी खेळताना हातात हात होते, चिंता नव्हती घड्याळाची, ना पाऊस पाण्याची झळ, आता खुद्द वेळच हात धरुन मागे लागते! शाळेचा एकही दिवस चुकवला नाही कधी, आता कुठे दिवसभर बाहेर पडावेसे वाटते? मोठे झालो तसे सारे भरकटत गेलो, 'आज' नाही, पाऊल उद्यात गुरफटत राहते! ©Anagha Ukaskar

#love_shayari #poem #Nojoto #nojotomarathi #kavita

People who shared love close

More like this

Trending Topic