नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी ह | मराठी प्रेम आणि प्

"नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी हवी फक्त फोन वर वेळ काढणारी नको तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी... नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी... वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको तर वेळ काढून बोलणारी हवी नुसती लांबून काळजी करणारी नको तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी... आयुष्यात अनेक येतील अनं जातील पण कायम मनात घर करून बसणारी हवी मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी... होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 नुसती निरर्थक बोलणारी नको 
तर भावना समजून घेणारी हवी 
फक्त फोन वर वेळ काढणारी नको 
तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी...

नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको 
तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी 
सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको 
तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी...

वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको 
तर वेळ काढून बोलणारी हवी 
नुसती लांबून काळजी करणारी नको 
तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी...

आयुष्यात अनेक येतील अनं जातील 
पण कायम मनात घर करून बसणारी हवी 
मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको 
तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी...

होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही 
पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी 
जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला 
इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी हवी फक्त फोन वर वेळ काढणारी नको तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी... नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी... वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको तर वेळ काढून बोलणारी हवी नुसती लांबून काळजी करणारी नको तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी... आयुष्यात अनेक येतील अनं जातील पण कायम मनात घर करून बसणारी हवी मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी... होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#us

People who shared love close

More like this

Trending Topic