White लग्न कर आणि मोकळा हो असं सगळेच म्हणतात मला | मराठी Life

"White लग्न कर आणि मोकळा हो असं सगळेच म्हणतात मला असेल कुणी बघितलेली तर सांग घेऊन येऊ तिलाच बोलतात मला.. वाटतं तितकं सोपं नसतं ना तरी लोकांचं बोलणं कळतं मला घेऊन येऊ बोलणं सोपं असतं पण मनात नसताना आणायचं कोणाला? लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना कसं सांगावं हे ह्या समाजाला... लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही सारं काही पटवावं लागतं मनाला घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला... माणूस सोडून सारं काही बघतात इथे महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला... प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता पण खूप काही बघितलं जातं लग्नाला जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला... वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात आणि हे सगळंच कळतंय मला पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 White लग्न कर आणि मोकळा हो 
असं सगळेच म्हणतात मला 
असेल कुणी बघितलेली तर सांग 
घेऊन येऊ तिलाच बोलतात मला..

वाटतं तितकं सोपं नसतं ना 
तरी लोकांचं बोलणं कळतं मला 
घेऊन येऊ बोलणं सोपं असतं 
पण मनात नसताना आणायचं कोणाला?

लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे 
कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला 
मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना 
कसं सांगावं हे ह्या समाजाला...

लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही 
सारं काही पटवावं लागतं मनाला 
घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना 
पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला...

माणूस सोडून सारं काही बघतात इथे 
महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला 
हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची 
सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला...

प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता 
पण खूप काही बघितलं जातं लग्नाला 
जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे 
म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला...

वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात 
आणि हे सगळंच कळतंय मला 
पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं 
हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

White लग्न कर आणि मोकळा हो असं सगळेच म्हणतात मला असेल कुणी बघितलेली तर सांग घेऊन येऊ तिलाच बोलतात मला.. वाटतं तितकं सोपं नसतं ना तरी लोकांचं बोलणं कळतं मला घेऊन येऊ बोलणं सोपं असतं पण मनात नसताना आणायचं कोणाला? लग्न म्हणजे दोन दिवसांचा कार्यक्रम नव्हे कारण,आयुष्य कसं असतं कळतं मला मरेपर्यंत Adjust करावं लागतं ना कसं सांगावं हे ह्या समाजाला... लग्न म्हणजे बाहुला बाहुली चं खेळ नाही सारं काही पटवावं लागतं मनाला घेऊन येऊ तिला म्हणणं सोपं वाटतं इतरांना पण, कळेल कसं जातीपातीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाला... माणूस सोडून सारं काही बघतात इथे महत्व फक्त जातपात श्रीमंती नोकरी आणि पैशाला हवी अशी मुलगी आयुष्यात कायमची सगळं सोडून जी येईल फक्त महत्व देऊन मला... प्रेम इथे कोणावरही केलं जातं काहीच न बघता पण खूप काही बघितलं जातं लग्नाला जग एका बाजूने आणि माझे मत वेगळे म्हणून घाई करून कष्ट नको माझ्या मनाला... वय वाढत जातं जिम्मेदाऱ्या वाढतात आणि हे सगळंच कळतंय मला पण, लोकांना वाटतं तितकं सोपं नसतं हल्ली खूप काही हवं असतं लग्नासाठी मुलाकडून मुलीला.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari in life quotes positive life quotes life quotes life quotes in marathi life shayari in hindi

People who shared love close

More like this

Trending Topic