जीवन आहे एक प्रवास
नव्या स्वप्नांची असते आस
धराल जर प्रयत्नांची कास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
या जीवनाच्या मार्गावर
असतील कित्येक विखुरलेले काटे
त्या काट्यांवर चालून जेव्हा
तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
या जीवनाच्या मार्गावर
भेटतील अनोळखी नाती
त्या नात्यांमधुनी जेव्हा,
निर्माण करू आपण, ओळख खास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
या जीवनाच्या मार्गावर
येतील अनेक अडथळे
तर कधी दुःखाची वादळे
जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
या जीवनाच्या मार्गावर
भेटतील कधी दुष्ट लोकं
जे घेतील हिरावून आपला हक्क
जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
या जीवनाच्या मार्गावर
यशस्वी आपण होण्यासाठी
मिळतील आपणास अनेक संधी
तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास
- ज्योती किरतकुडवे (साबळे)
https://youtu.be/9GzXB6UltVU?si=DJTjqnfUaI83ww_2
#जीवनएकप्रवास
#MarathiKavita
#JKpoetess