White तो वरचा देव असे पायलट..
शब्दवेडा किशोर
माहित नाही रंग रुप काही
माहिती नाही स्वभाव खास त्याचा
तरीही आपण ठेवतोच ना विश्वास
आपल्या आयुष्य नामक
विमानाच्या पायलटवर कायमचा........ ll१ll
तिकीट काढून बसतो या आयुष्य नावाच्या विमानात
पण आयुष्याच्या प्रवासाबद्दल नसते काही माहिती
तरीही असते ना खात्री त्याबद्दल
नसते कुठली चिंता किंवा भिती........ ll२ll
नाही वाटत कधीच कुठलीच काळजी
किंवा नाही घेत कुणीही कधीच कुठलीही शंका
निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र
असतो त्याबद्दल विश्वास पक्का........ ll३ll
असाच ठेवुया दृढ विश्वास आपण सदा
अशीच ठेवु त्या परमेश्वरावरही श्रद्धा
सहजपणे जगु आपण जीवन मग
नाही होणार आपल्याला कधीच कुठलीही बाधा........ ll४ll
करत रहातो आपण सतत चिंता काळजी
भूत भविष्याची जीवनात आपण
का नाही ठेवत देवावर श्रद्धा भाव
तोच भवसागरातून नेईल तारुन........ ll५ll
जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने
स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण
मात्र देवावर हवी श्रद्धा भक्ती पूर्ण
मग तरंगत राहु आनंदात सर्वजण........ ll६ll
जसा ठेवतो आपण त्या विमानाच्या पायलटवर विश्वास
तसाच विश्वास असला पाहिजे आपला त्या परमेश्वरावर
मग नाही करायची कधी काळजी कसलीच
तो नेईल बरोबर आपल्या आयुष्याला सन्मार्गावर........ ll७ll
©शब्दवेडा किशोर
#आयुष्याच्या_वाटेवर