White सोसून त्रास ,भोगून वनवास
कुणीच नसतं आनंदी आईसारखं
नवजन्म देताना ही मरणाच्या दारातून
परतताना कुणीच नसत समाधानी आईसारखं
स्वार्थी जगात धोक्याशिवाय काहीच मिळत नाही
मतलबी दुनियेत कुणीच नसतं विश्वासू आईसारखं
हिशोबी दुनियेत फायद्यासाठीच असतात नाती
घाट्याच्या व्यवहारात ही कुणीच नसतं दानशूर आईसारखं
©Ashvini Patil
#mothers_day