White
विषय - लोभ.
*****************************
लोभ नसावा कधी
कोणास कशाचा,
मातीत मिसळून जातो
हा देह चंदनाचा.
मिळेल त्या भाकरीवर
आनंद मनी शोधावा,
कष्टाचा मेवा नेहमी
अंतरी असाच असावा.
नको त्या गोष्टीसाठी
स्वतःलाच विसरतो,
अखेर प्रलोभनांना
बळी का पडतो.?
माणूस असा घडावा.
मृत्यूनंतरही त्याचा,
अंतरंग तो पाहता
सन्मान होई चारित्र्याचा...!
--------------------
राजेंद्रकुमार शेळके .
- नारायणगाव, पुणे .
©Rajendrakumar Shelke
#Sad_Status