नारी
असे कसे रे तिला घडवले कणखर देवा...
सदैव आला वाटत मज नारीचा हेवा!
डोई अक्षदा सात पावले जशी चालते...
वसाच असतो तिने घेतला करणे सेवा!
एकासाठी किती सोडते जिवलग नाती...
नवरा असतो काळजातला अमोल ठेवा!
जबाबदारी पार पाडते राखत मर्जी...
पदरी पडतो कधी स्तुतीचा थोडा मेवा!
येते नारी भार्या म्हणुनी बनते माता...
प्रणाम करतो त्रिवार म्हणतो मी वा रे वा!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#VickyKatrinaWedding