शारदे वरदान दे मज
शारदे वरदान दे
सूर माझे गोड व्हावे
एवढे मज दान दे
ही तुझी आहे कृपा की
गायला जमते मला
भाग्य आहे लाभले हे
चालतो माझा गळा
शब्द स्वर लय ताल यांचे
नेमके मज भान दे
ज्ञान दिधले मज गुरुंनी
वाट त्यांनी दावली
त्यामुळे मम संगिताची
साधना ही चालली
साधनेला यश मिळू दे
तू मला स्वरज्ञान दे
साधना चालो निरंतर
दंभ यावा ना परी
नम्रता अंगी असावी
लाभली किर्ती जरी
दान दे तू मज यशाचे
नम्रतेचे वाण दे
©जितू
#navratri