*!!बुद्ध!!** 🌹
*त्रिसरण अन पंचशीलेचा*
*मार्ग दावूनी भला*
* *करुणा सत्य अहिंसेची*
*दीव्य दावली कला*
*साऱ्या विश्वात बुद्ध भला*
*आज नमितो बुद्धाला!धृ* !
*शुद्धोधनाचा हा सूत*
*जन्माला तो राजकुळात*
*सारी सुखं जोडुनी हात*
*परी रमला ना तो त्यात*
*दुःखाचे हे मूळ शोधण्या*
*निघे तो अरण्याला*
*साऱ्या विश्वात ....!१!*
*पिंपळाच्या झाडाखाली*
*बुध्द शांत मुद्रा घाली*
*ज्ञानाची पसरली लाली*
*दिव्यत्वाची प्रचिती आली*
*सिद्धार्थाचा बुद्ध जाहला*
*प्रभा आली उदयाला*
*साऱ्या विश्वात...!२!*
*संसाराच्या भवसागरि*
*धम्म बुद्धाचा एकच तारी*
*गौतमाला स्मरल्यावरी*
*तुम्ही तराल हो नरनारी*
*जीवनातले दुःख हरण्या*
*जा शरण तथागताला*
*साऱ्या विश्वात...!३!*
©Shankar kamble
#बुद्ध #बुद्धपूर्णिमा #गौतम_बुद्ध #गौतम #शांती #बुद्ध_के_विचार
#BuddhaPurnima