*!!बुद्ध!!** 🌹 *त्रिसरण अन पंचशीलेचा* *मार्ग दा

"*!!बुद्ध!!** 🌹 *त्रिसरण अन पंचशीलेचा* *मार्ग दावूनी भला* * *करुणा सत्य अहिंसेची* *दीव्य दावली कला* *साऱ्या विश्वात बुद्ध भला* *आज नमितो बुद्धाला!धृ* ! *शुद्धोधनाचा हा सूत* *जन्माला तो राजकुळात* *सारी सुखं जोडुनी हात* *परी रमला ना तो त्यात* *दुःखाचे हे मूळ शोधण्या* *निघे तो अरण्याला* *साऱ्या विश्वात ....!१!* *पिंपळाच्या झाडाखाली* *बुध्द शांत मुद्रा घाली* *ज्ञानाची पसरली लाली* *दिव्यत्वाची प्रचिती आली* *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* *प्रभा आली उदयाला* *साऱ्या विश्वात...!२!* *संसाराच्या भवसागरि* *धम्म बुद्धाचा एकच तारी* *गौतमाला स्मरल्यावरी* *तुम्ही तराल हो नरनारी* *जीवनातले दुःख हरण्या* *जा शरण तथागताला* *साऱ्या विश्वात...!३!* ©Shankar kamble"

 *!!बुद्ध!!** 🌹
 *त्रिसरण अन पंचशीलेचा* 
 *मार्ग दावूनी भला* 
* *करुणा सत्य अहिंसेची* 
 *दीव्य दावली कला* 
 *साऱ्या विश्वात बुद्ध भला* 
 *आज नमितो बुद्धाला!धृ* !

 *शुद्धोधनाचा हा सूत* 
 *जन्माला तो राजकुळात* 
 *सारी सुखं जोडुनी हात* 
 *परी रमला ना तो त्यात* 
 *दुःखाचे हे मूळ शोधण्या* 
 *निघे तो अरण्याला* 
 *साऱ्या विश्वात ....!१!* 

 *पिंपळाच्या झाडाखाली* 
 *बुध्द शांत मुद्रा घाली* 
 *ज्ञानाची पसरली लाली* 
 *दिव्यत्वाची प्रचिती आली* 
 *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* 
 *प्रभा आली उदयाला* 
 *साऱ्या विश्वात...!२!* 

 *संसाराच्या भवसागरि* 
 *धम्म बुद्धाचा एकच तारी* 
 *गौतमाला स्मरल्यावरी* 
 *तुम्ही तराल हो नरनारी* 
 *जीवनातले दुःख हरण्या* 
 *जा शरण तथागताला* 
 *साऱ्या विश्वात...!३!*

©Shankar kamble

*!!बुद्ध!!** 🌹 *त्रिसरण अन पंचशीलेचा* *मार्ग दावूनी भला* * *करुणा सत्य अहिंसेची* *दीव्य दावली कला* *साऱ्या विश्वात बुद्ध भला* *आज नमितो बुद्धाला!धृ* ! *शुद्धोधनाचा हा सूत* *जन्माला तो राजकुळात* *सारी सुखं जोडुनी हात* *परी रमला ना तो त्यात* *दुःखाचे हे मूळ शोधण्या* *निघे तो अरण्याला* *साऱ्या विश्वात ....!१!* *पिंपळाच्या झाडाखाली* *बुध्द शांत मुद्रा घाली* *ज्ञानाची पसरली लाली* *दिव्यत्वाची प्रचिती आली* *सिद्धार्थाचा बुद्ध जाहला* *प्रभा आली उदयाला* *साऱ्या विश्वात...!२!* *संसाराच्या भवसागरि* *धम्म बुद्धाचा एकच तारी* *गौतमाला स्मरल्यावरी* *तुम्ही तराल हो नरनारी* *जीवनातले दुःख हरण्या* *जा शरण तथागताला* *साऱ्या विश्वात...!३!* ©Shankar kamble

#बुद्ध  #बुद्धपूर्णिमा #गौतम_बुद्ध #गौतम #शांती #बुद्ध_के_विचार

#BuddhaPurnima

People who shared love close

More like this

Trending Topic