White *"तिने पाहिलं स्टेटस, पण…"*
तिने पाहिलं माझ्या वाढदिवसाचं स्टेटस,
डोळ्यांनी वाचलं, पण मनाने सोडलं वाटंस...
मनात ओलावा नव्हताच आता तिच्या,
आठवणीत सावल्या मात्र अजूनही माझ्या…
क्षणभर वाटलं, एखादा शब्द तरी तिचा येईल,
त्या शुभेच्छांच्या ओठांवर जरा तरी ती थांबेल...
पण नाही… तिने फक्त पाहिलं आणि गप्प बसली,
जणू माझ्या अस्तित्वाला नजरेनेच झिडकारली…
कधीकाळी माझ्या नावाने रुसून बसणारी ती,
आज माझ्या वाढदिवसालाही बोलत नव्हती...
शब्दांतली माया तिच्या कधीच होती विरली,
आणि माझ्या आठवणीतली जागा गप्पच राहिली…
तिने स्टेटस पाहिलं, पण चटकन नजर फिरवली,
कधीकाळची नाती तिने एका नजरेनेच मिटवली...
मी वाट पाहत राहिलो, एक मॅसेज तरी येईल,
बोलेल वाढदिवसाच्या शुभेच्छा, निदान इमोजी तरी देईल...
पण तिच्या शांततेनेच मला, खूप काही सांगितलं,
आता जरा दूरच राहा, तिच्या अबोल्याने मागितलं...
ठीक आहे, चुकी तुझी नाही, असेल कदाचित माझी,
बोल्ली नाही तरी ठीक, पण आठवण म्हणून राहा तेवढी माझी...
©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
#Thinking #Life #love