राखीपुनव...
धागा प्रतीक आहे बांधून आजमावा...
राहो सुखात भाऊ, करते बहीण धावा!
पुनवेस श्रावणाच्या वाटेकडे पहाते...
ओवाळणीस बंधू, धावून आज यावा!
मोठी असो वयाने की धाकटी असू दे…
आईसमान माया, ती लावतेच भावा!
आईवडील कोणा जन्मास लाभले ते...
लावून जीव ताई, भरते हरेक घावा!
काढून वेळ थोडा भेटत चला तिलाही...
झुरते जशी मनी ती, तू पण तसा झुरावा!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#Rakhi