a-person-standing-on-a-beach-at-sunset तुझ्या ओठात | English कविता

"a-person-standing-on-a-beach-at-sunset तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे शब्दवेडा किशोर तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे अबोल्यात बांधलेले तू भाव माझे आत हृदयाच्या ठेवलेस तु जरी कोरून तरीही नकळत रेखाटतेस सगळीकडेच नाव माझे ||१|| तुझ्या स्पर्शात शहारलेले नाव माझे अधीर एकवटलेले तू भाव माझे करतेस सांत्वन उसण्यापरी स्वतःचे तरीही चोरून चोरून तु सदा घेतेस नाव माझे ||२|| तुझ्या आवाजात मोहरलेले नाव माझे ठेवतेस हृदयी जपूनिया कायम आवरून उधाणलेले भाव माझे असतो गुलमोहर तुझा तुझ्या मनोअंगणी तरी हातातल्या तुझ्या प्रेमाच्या परडीत तू फुलवतेस नाव माझे ||३|| तुझ्या रातीत असे चांदण्यानी गोंदलेले नाव माझे तुझे ते स्वप्न जरी तरी तुला लागलेले सत्यात आसुसलेले भाव माझे भोवती असतो बिलगून झोपेचा पाश जरी तरीही स्वतःच्या धुसर नजरेत स्पष्ट पाहतसे नाव माझे ||४|| ©शब्दवेडा किशोर"

 a-person-standing-on-a-beach-at-sunset तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे
शब्दवेडा किशोर 
तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे
अबोल्यात बांधलेले तू भाव माझे 
आत हृदयाच्या ठेवलेस तु जरी कोरून तरीही
नकळत रेखाटतेस सगळीकडेच नाव माझे         ||१||
तुझ्या स्पर्शात शहारलेले नाव माझे 
अधीर एकवटलेले तू भाव माझे
करतेस सांत्वन उसण्यापरी स्वतःचे 
तरीही चोरून चोरून तु सदा घेतेस नाव माझे       ||२||
तुझ्या आवाजात मोहरलेले नाव माझे 
ठेवतेस हृदयी जपूनिया कायम
आवरून उधाणलेले भाव माझे 
असतो गुलमोहर तुझा तुझ्या मनोअंगणी 
तरी हातातल्या तुझ्या प्रेमाच्या परडीत
तू फुलवतेस नाव माझे                           ||३||
तुझ्या रातीत असे चांदण्यानी 
गोंदलेले नाव माझे 
तुझे ते स्वप्न जरी तरी तुला लागलेले
सत्यात आसुसलेले भाव माझे 
भोवती असतो बिलगून झोपेचा पाश जरी तरीही
स्वतःच्या धुसर नजरेत स्पष्ट पाहतसे नाव माझे      ||४||

©शब्दवेडा किशोर

a-person-standing-on-a-beach-at-sunset तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे शब्दवेडा किशोर तुझ्या ओठात गुंतलेले नाव माझे अबोल्यात बांधलेले तू भाव माझे आत हृदयाच्या ठेवलेस तु जरी कोरून तरीही नकळत रेखाटतेस सगळीकडेच नाव माझे ||१|| तुझ्या स्पर्शात शहारलेले नाव माझे अधीर एकवटलेले तू भाव माझे करतेस सांत्वन उसण्यापरी स्वतःचे तरीही चोरून चोरून तु सदा घेतेस नाव माझे ||२|| तुझ्या आवाजात मोहरलेले नाव माझे ठेवतेस हृदयी जपूनिया कायम आवरून उधाणलेले भाव माझे असतो गुलमोहर तुझा तुझ्या मनोअंगणी तरी हातातल्या तुझ्या प्रेमाच्या परडीत तू फुलवतेस नाव माझे ||३|| तुझ्या रातीत असे चांदण्यानी गोंदलेले नाव माझे तुझे ते स्वप्न जरी तरी तुला लागलेले सत्यात आसुसलेले भाव माझे भोवती असतो बिलगून झोपेचा पाश जरी तरीही स्वतःच्या धुसर नजरेत स्पष्ट पाहतसे नाव माझे ||४|| ©शब्दवेडा किशोर

#माझ्या_लेखणीतून

People who shared love close

More like this

Trending Topic