नशिबात बायको म्हणून कुणीही असो
इतिहासात आणि मनावर नाव प्रेयसीचं कोरलं जातं,
मनातलं नाव तर कधीच पुसलं जात नाही
म्हणून मन मारून अनं अश्रू लपवून संसार केलं जातं...
मनात कोण अनं शरीर कोणाचा
तरी मनाला विसरून शरीराला विचारलं जातं
आपल्या कल्पनेत कोण अनं भविष्य कोणासोबत
हे इतरांच्या मनानुसार ठरवलं जातं...
नात्यात झालेच जर लहान मोठे कलह
चुकीचं तेव्हाही दोघांनाच ठरवलं जातं,
आपल्या मनाचं तर कुणी विचार केलं नाही
जेव्हा आयुष्यभर आपलं मन मारलं जातं...
आवड बदलते पण प्रेम नाही
तरीही प्रेमाला बदनाम केलं जातं
मनात कुणीही असल्याने कोणाला फरक पडत नाही
म्हणून स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लग्न केलं जातं....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#bajiraomastani sad shayari sad quotes sad status status for sad