दुमदुमली पंढरी अवघी

दुमदुमली पंढरी अवघी
आले वारकर
  • Latest
  • Popular
  • Video

दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी आले वारकरी हरीहरी घेऊनी तुळस डोई नाचत आले दारी तुझा महिमा अगाध मुखी नाम तुझेच विठ्ठला गर्दीतही होऊन‌‌ तल्लीन जीव‌ तव चरणी अर्पिला पहा चंद्रभागे तीरी‌ अंगणी पोहोचले वारकरी भरूनी आले डोळे पाहूनी तुझे रुप हरी हरी ना भान ना तहान कसली भक्तीरुपे भरीले पोट दर्शन देऊन लेकरांस सोड सुखरुप घरी..धरुनी बोट ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

 दुमदुमली पंढरी अवघी

दुमदुमली पंढरी अवघी
आले वारकरी हरीहरी
घेऊनी तुळस डोई
नाचत आले दारी

तुझा महिमा अगाध 
मुखी नाम तुझेच विठ्ठला
गर्दीतही  होऊन‌‌ तल्लीन
जीव‌ तव चरणी अर्पिला

पहा चंद्रभागे तीरी‌ 
अंगणी पोहोचले वारकरी
भरूनी आले डोळे
पाहूनी तुझे रुप हरी हरी

ना भान ना तहान कसली
भक्तीरुपे भरीले पोट
दर्शन देऊन लेकरांस
सोड सुखरुप घरी..धरुनी बोट

✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

दुमदुमली पंढरी अवघी

12 Love

Trending Topic