हाडामासाचा फक्त शरीर नव्हे
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती
नऊ महिने वेदना सहन करणारी
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..
फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...
प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती
कळेलच किती कणखर आहे ती...
नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here